General Knowledge of Maharashtra
महाराष्ट्र राज्याची निर्मिती :
ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.
अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग :
- पश्चिम महाराष्ट्र - पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर
- मराठवाडा - औरंगाबाद विभाग
- विदर्भ - अमरावती व नागपूर विभाग
- खानदेश - धुळे, नंदूरबार, जळगाव
- कोकण - मुंबई शहर व उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग
महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग :
- पुणे - सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
- नागपूर - वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
- कोकण - मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे-रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग.
- औरंगाबाद - बीड, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
- अमरावती - बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ.
- नाशिक - नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव.
महाराष्ट्राच्या शेजारील राज्ये :
- महाराष्ट्राच्या ईशान्येला -> छत्तीसगड,
- आग्नेयला -> आंध्रप्रदेश,
- दक्षिणेला -> कर्नाटक-गोवा,
- पश्चिमेला -> दमण दीव व दादरा नगर हवेली हे केंद्र शासित प्रदेश,
- वायव्येला -> गुजरात,
- उत्तरेला -> उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश आहे.
महाराष्ट्रातील विद्यापिठे :
- पुणे विद्यापीठ पुणे 1848
- मुंबई विद्यापीठ मुंबई 1857
- नागपूर विद्यापीठ नागपूर 1925
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद 1958
- संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती 1983
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड 1994
- एस एन डी टी मुंबई 1951
- (महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी देशातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना 1951 ला केली. पुढे 1916मध्ये त्याचे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ असे नामकरण झाले.)
- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 1963
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक 1988
- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव 1989
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 1995
- भारती विद्यापीठ पुणे 1964
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक 1988
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणोरे(रायगड) 1889
- कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक(नागपूर) 1996
- श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ बालेवाडी(पुणे) 1996
- पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर 2000
- सोलापूर विद्यापीठ सोलापूर 2004